Dharwad

हुबळी-धारवाडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन; 50 टक्के दंडाची सूट

Share

हुबळी-धारवाड जुळ्या शहरांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंडामध्ये ५० टक्के सूट देण्यात आली आहे. या सवलतीमुळे धारवाड तालुक्यातील नरेंद्र गावातील एका व्यक्तीने तब्बल ९ हजार रुपयांचा दंड भरून सुटकेचा श्वास घेतला आहे.

हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये ५० टक्के सूट दिली आहे. ही सूट लागू असतानाच नरेंद्र गावातील एक व्यक्ती बाजारात आला. त्यावेळी धारवाड वाहतूक पोलीस ठाण्याचे एएसआय सीता कटगी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीचे वाहन थांबवून दंडाची पडताळणी केली.

पडताळणीत त्या व्यक्तीच्या विरोधात ३५ प्रकरणे (केसेस) असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला या प्रकरणांची माहिती दिली आणि दंड भरण्यास सांगितले. एकूण १८ हजार रुपयांचा दंड होता, पण ५० टक्के सूट मिळाल्यामुळे त्याला ९ हजार रुपये भरावे लागले. तात्काळ त्या व्यक्तीने दंडाची रक्कम भरली आणि त्याला मोठा दिलासा मिळाला.

Tags: