बागलकोट जिल्ह्यातील बादामी शहरात झालेल्या बेकायदेशीर गॅस सिलेंडर स्फोटानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्याभरातील बेकायदेशीर सिलेंडर विक्री केंद्रांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

बागलकोट पोलीस उपअधीक्षक गजानन सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवनगर आणि जिल्ह्यातील काही भागात धाड टाकली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी बेकायदेशीरपणे साठवलेले २८ सिलेंडर जप्त केले आहेत.
या बेकायदेशीर गॅस विक्री केंद्रांचा बंदोबस्त करण्यासाठी बागलकोट जिल्हा प्रशासनाने गंभीर पाऊले उचलली आहेत. पोलीस विभागासोबतच अग्निशमन दल आणि अन्न विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी काळात अशा केंद्रांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


Recent Comments