Bagalkot

बदामीमध्ये मिनी सिलिंडरचा स्फोट, चार जण जखमी

Share

बागलकोट जिल्ह्यात घडलेल्या एका भयानक घटनेत अवैधपणे साठवलेले मिनी गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने दुकान मालकासह चार जण भाजले आहेत.

ही घटना बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहरात घडली. शहरातील दादाफीर यांच्या दुकानात बेकायदेशीररित्या मिनी गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आला होता. याच सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकान मालक दादाफीर जमादार यांच्यासह होमगार्ड कर्मचारी रवी, रंगनाथ, दादा साहेब आणि सलीम हे जखमी झाले.

घटनेनंतर तात्काळ जखमींना बदामी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Tags: