Bagalkot

बागलकोटमधील चोरीचा प्रकार अमेरिकेतून रोखला!

Share

सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चड्डी गँगचा डाव अमेरिकेत स्थायिक झालेल्या त्यांच्या मुलीच्या सतर्कतेमुळे फसला. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण आपल्या मोबाईलवर पाहत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.

मुलीने वेळीच आपल्या आई-वडिलांना फोन करून सावध केले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बेंगळुरू जवळच्या मुधोळ शहरात घडली आहे. मुधोळ शहरात चड्डी गँगने धुमाकूळ घातला. हा प्रकार अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. अमेरिकेतून आपल्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज पाहून मुलीने घरी फोन केला. घरातील लोकांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी पळ काढला. हनुमंतगौडा संकप्पनावर यांची मुलगी श्रुती संकप्पनावर अमेरिकेत स्थायिक आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या श्रुतीने आपल्या मोबाईलवर सीसीटीव्हीचे फुटेज पाहून फोन करून आई-वडिलांना सावध केले. त्यांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी पळ काढला. राजरोसपणे घरफोडीसाठी आलेल्या चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरातील सिद्धरामेश्वर नगरमध्ये काल रात्री ही घटना घडली. याच भागातून ११ ग्रॅम सोने आणि ४० हजार रोख रक्कम चोरी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

शरीरावर फक्त शर्ट आणि चड्डी, कसलीही भीती न बाळगता राजरोसपणे चोरीसाठी घरात प्रवेश. एक ठिकाणी यशस्वी चोरी तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न. अमेरिकेत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चड्डी गँगचा हा प्रकार उघडकीस आणला. ही घटना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ शहरातील सिद्धरामेश्वर नगरमध्ये घडली. सिद्धरामेश्वर नगरमध्ये सेवानिवृत्त पीडब्ल्यूडी इंजिनिअर हनुमंतगौडा संकप्पनावर आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांची मुलगी श्रुती अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते, तर दुसरी मुलगी बेंगळुरूत राहते. त्यामुळे घरात फक्त वृद्ध जोडपेच राहतात. याचाच फायदा घेऊन चार चोरांच्या ‘चड्डी गँग’ने रात्री १ ते २ च्या दरम्यान घरात प्रवेश केला. त्यावेळी अमेरिकेत दिवस होता. मुलगी श्रुती आपल्या मोबाईलवर सीसीटीव्हीचे फुटेज पाहत असताना, तिला चोरट्यांचा घरात शिरतानाचा व्हिडिओ दिसला. तिने लगेचच आपल्या आई-वडिलांना फोन करून सावध केले. मुलीचा फोन आल्यावर हनुमंतगौडा संकप्पनावर यांनी घराचा दरवाजा उघडताच चोरट्यांनी पळ काढला.

“चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना आम्ही पाहताच त्यांनी पळ काढला,” असे हनुमंतगौडा संकप्पनावर, सेवानिवृत्त इंजिनिअर, यांनी सांगितले.  अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने सावध केल्यावर हनुमंतगौडा यांनी बाहेर येऊन पोलिसांना फोन केला. मुधोळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. पण तोपर्यंत चड्डी गँग पळून गेली होती. त्यानंतर, त्याच परिसरात आणखी एका घरात चोरी झाल्याचे समोर आले. या गँगने हनुमंतगौडा यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्याआधी अशोक करिहोन यांच्या घरातून ११ ग्रॅम सोने आणि ४० हजार रोख रक्कम चोरली होती. मात्र, सेवानिवृत्त इंजिनिअर हनुमंतगौडा यांच्या घरातील चोरीचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. अमेरिकेत राहणाऱ्या श्रुतीच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या घरातील चोरी टळली. मुधोळ पोलिसांनी चड्डी गँगविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

“आम्ही गुन्हा दाखल केला असून चोरांचा तपास सुरू आहे,” अशी माहिती बागलकोटचे एसपी सिद्धार्थ गोयले यांनी दिली. एकंदरीत, मुधोळमधील चोरीचा हा प्रकार अमेरिकेतून उघडकीस आला असून, पोलिसांनी या चड्डी गँगला लवकरात लवकर पकडून पुढील चोरीचे प्रकार थांबवणे गरजेचे आहे.

Tags: