धर्मांतरण होत असल्याच्या आरोपावरून धारवाडमध्ये ख्रिस्ती प्रार्थना सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या खाजगी ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छापे टाकले. यानंतर धर्मांतरीत लोकांना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

धारवाडमधील एलआयसी कर्मचारी भवन आणि लाईन बाजारमधील अंजनेय मंदिरासमोरील टायटन शोरूमच्या वरच्या मजल्यावर ख्रिस्ती पाद्री प्रार्थनांच्या नावाखाली धर्मांतरण करत असल्याचा आरोप होता. या आरोपांच्या आधारे धारवाडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही ठिकाणी छापे टाकून अनेकांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
छापा टाकण्यापूर्वी बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हिडिओ शूटिंग करत गेले होते. त्यामुळे धर्मांतरण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. यादरम्यान ५० पेक्षा जास्त महिला प्रार्थनांच्या नावाखाली एकत्र आल्या होत्या आणि त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचा बजरंग दलाचा आरोप आहे.
या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे नेते गुरुशांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या संदर्भात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी या धर्मांतरीत लोकांना ताब्यात घेतले आहे.


Recent Comments