रस्त्यावरून जात असलेल्या पादचाऱ्याला ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारवाड तालुक्यातील शिंगनहळ्ळी क्रॉसजवळील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी उशिरा रात्री घडली.

या अपघातात होविहडगली येथील होन्नप्पा (वय ४६) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बेळगावकडून धारवाडकडे येणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या होन्नप्पाला जोरदार धडक दिली. त्यामुळे होन्नप्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गरग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तक्रार दाखल केली.


Recent Comments