हळदी-कुंकू हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीमधील सकारात्मक मूल्यांचा प्रसार होतो, असे धारवाडच्या मनगुंडी येथील चन्नय्यागिरीच्या गुरुबसवा महामठाचे बसवानंद महास्वामी म्हणाले. येथील लिंगायत भवनामध्ये बुधवारी लिंगायत महिला समाजातर्फे ‘संत वाणी आणि श्रावण मासातील हळदी-कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिव्य सानिध्य लाभलेल्या बसवानंद महास्वामींनी हळदी-कुंकवाचे महत्त्व सांगितले.

‘भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान देऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यानुसार, श्रावण महिन्यानिमित्त लिंगायत महिला समाजाने हा अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, श्रावण महिन्यात महिलांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सामूहिक हळदी-कुंकू आयोजित करणे महत्त्वाचे आहे. हळद केवळ रोगप्रतिकारकच नाही, तर त्वचेची चमकही वाढवते. हळदीचे बाह्य आणि अंतर्गत सेवन केल्याने शरीरातील अशुद्धी बाहेर काढण्यास मदत होते. हा कार्यक्रम असाच सातत्याने सुरू राहावा आणि महिलांनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी लिंगायत महिला समाजाच्या मानद अध्यक्षा शैलजा भिंगे, रत्नप्रभा बेल्लद, ज्योती बादामी, शैला पाटील, आशा पाटील, सुरेखा मानवी, अनुराधा बागी, अध्यक्षा मधुमती हिरेमठ, सचिव रक्षा देगिनाळ, सहसचिव सरोजा निशानहार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments