Dharwad

धारवाडमध्ये निवडणूक आयोगाविरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

Share

देशभरात अनेक ठिकाणी ‘मतदार चोरी’ झाल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून धारवाडमध्ये युवक काँग्रेसने ‘मतदार चोरी’विरोधात अभियान सुरू केले आहे.

धारवाडमधील रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या गाड्यांवर ‘मतदार चोरी थांबवा’ असे पोस्टर लावून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात आपला रोष व्यक्त केला. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने अशा प्रकारे ‘मतदार चोरी’ केली असल्याचा आरोप करत, याबाबत योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

Tags: