उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या उडुपी जिल्ह्यातील मानसी जे सुवर्णा हिच्या कामगिरीचे महिला आणि बाल विकास विभाग मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कौतुक केले आहे.

मल्पे येथील मच्छीमार मालती आणि जगदीश सुवर्णा यांची मुलगी असलेल्या मानसीने जिंकलेले कांस्यपदक राज्यातील इतर बॉक्सरसाठी प्रेरणादायी आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये बॉक्सिंग हा खेळ फारसा खेळला जात नाही. या खेळाला आणखी प्रोत्साहन मिळावे, किनारपट्टीवरील मुलांनी बॉक्सिंगमध्ये चमक दाखवावी, अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली.
“मानसी सुवर्णाने येणाऱ्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिक पदके जिंकून राज्यासह देशाची मान वाढवावी. तिच्या या कामगिरीला आमच्या सरकारचे नेहमीच पाठबळ असेल,” असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Recent Comments