धारवाड तालुका भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस शशिकला मसूती यांचे पती ईश्वर मसूती (५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

धारवाड तालुक्यातील उप्पिन बेटगेरी गावातील त्यांच्या राहत्या घरी ईश्वर मसूती यांनी गळफास लावून घेतला.
काल रात्री घरात कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केली असून, यामागे आरोग्य समस्या हेच कारण असावे असा संशय आहे. त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
आत्महत्या केलेले ईश्वर मसूती हे धारवाड ग्रामीण मतदारसंघाच्या माजी आमदार सीमा मसूती यांचे नातेवाईक आहेत. घटनास्थळी गरग पोलीस ठाण्याचे पीएसआय सिद्धरामप्पा उन्नद यांनी भेट देऊन गुन्हा दाखल करून घेतला आहे.


Recent Comments