Dharwad

धारवाड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी गुंजन आर्य रुजू

Share

२०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी गुंजन आर्य यांनी मंगळवारी संध्याकाळी धारवाड जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. मावळते एस.पी. गोपाल ब्याकोड यांनी त्यांना अधिकार सोपवले.

गुंजन आर्य हे मूळचे मध्य प्रदेश राज्याचे असून, ते २०१८ च्या कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी रायचूर जिल्ह्याच्या उप-पोलीस अधीक्षक म्हणून, तसेच चिक्कमंगळूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. धारवाडचे एस.पी. म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते बेंगळुरूमध्ये राज्य अंतर्गत सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.

बेंगळुरूला बदली झालेल्या डॉ. गोपाल ब्याकोड यांना आज संध्याकाळी एस.पी. कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरोप दिला, तर नवीन एस.पी. गुंजन आर्या यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमणी, उप-पोलीस अधीक्षक विनोद मुक्तेदार, सी.ई.एन. डी.वाय.एस.पी. शिवाानंद कटगी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags: