धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आज धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांनी बेंडेहळ्ळा परिसरासह आसपासच्या पूरग्रस्त गावांना भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी मंत्री लाड यांनी आमदार कोनरड्डी यांच्यासमवेत बाईकवरून गावांची पाहणी केली. जोरदार पावसामुळे धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यात, अरेखुरहट्टी गावासह इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अरेखुरहट्टी गावात मंत्री संतोष लाड यांनी स्वतः बाईक चालवत पाहणी दौरा केला, यावेळी स्थानिक आमदार कोनरड्डी यांनी जिल्हा त्यांना साथ दिली.
अरेखुरहट्टी, हेबसूर, किरेसूर या गावांजवळून वाहणाऱ्या बेंडेहळ्ळा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, गावांनाही फटका बसला आहे. गावांना भेट दिल्यानंतर संतोष लाड यांनी बेंडेहळ्ळा परिसराचीही पाहणी केली आणि ग्रामस्थ तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडून झालेल्या पावसाळी नुकसानीची माहिती घेतली.
Recent Comments