ऐनापूर येथे जैन समाजाच्या विकासासाठी आयोजित जैन समाजाच्या महाअधिवेशनाला कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून सुमारे एक लाख जैन श्रावक आणि श्राविका उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी केले. “तुमच्या हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी तुम्ही एकत्र उभे राहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा,” असे राष्ट्रसंत गुणधरनंदी मुनी महाराज यांनी सांगितले.

ऐनापूर येथे जैन समाजाचे हे भव्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बेळगाव, विजापूर, बागलकोट, जमखंडी, सांगली, कोल्हापूर अशा विविध शहरांतून सुमारे एक लाख जैन समाजाचे बांधव उपस्थित होते. कोणत्याही अपेक्षेशिवाय, स्वतःच्या वाहनांनी प्रवास करून ते या सभेत सहभागी झाले होते.
राज्याच्या राज्यपालांनी या सभेत जैन समाजाच्या मागण्या स्वीकारल्या असून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या मागण्यांबद्दल माहिती देऊन लवकरच निर्णय घेण्यास आणि समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास मी स्वतः सूचना देईन, असे आश्वासन दिले आहे. याशिवाय, राज्यपालांनी जैन समाजाच्या इतर मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे समाजाच्या संघर्षाला नक्कीच यश मिळेल असे मुनी महाराज म्हणाले.
जैन समाजाचे अनेक राजकीय नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी अधिवेशनाचा खर्च स्वतः उचलला आणि ते अत्यंत शुद्ध मनाने सहभागी झाले, अशा सर्वांना स्वामीजींनी आशीर्वाद दिले.
सुकुमार बन्नुरे, इन न्यूज कागवाड.
Recent Comments