सुट्टीवर बाहेरगावी गेलेल्या दोन शिक्षकांच्या घरात चोरांनी डल्ला मारून सोने आणि रोकड लंपास केल्याची घटना धारवाड जिल्ह्यातील क्यारकोप्पा गावाजवळ घडली आहे.

धारवाड तालुक्यातील क्यारकोप्पा गावाच्या रस्त्यावर असलेल्या लोकनाथ आणि सोमनगौडा पाटील यांच्या घरात ही चोरी झाली आहे. हे दोघेही व्यावसायिक शिक्षक असून, गेल्या दोन दिवसांपासून सुट्टी असल्याने ते गावी गेले होते. याच दरम्यान, शिक्षकांच्या घरातून ७० ग्रॅम सोने आणि १.२० लाख रुपये रोकड चोरीला गेली आहे. धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करून घेतला आहे.
Recent Comments