Bagalkot

बागलकोट: अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Share

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बागलकोट जिल्ह्यातील कुलगिरी क्रॉसजवळ घडली आहे.

हळगेरी गावातील अंजनेय मंदिरात दर्शनासाठी निघालेले एस.एन. तिम्मापूर गावचे रहिवासी विठ्ठल आणि त्यांची हुलिगेम्मा नावाची तीन वर्षांची मुलगी, कुलगिरी क्रॉसजवळ मोटारसायकलवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

या अपघातात वडील आणि मुलगी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बादामी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Tags: