Delhi

*नवी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय चिंतन बैठक; आमदार अभय पाटील यांचा सहभाग*

Share

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासह आगामी राजकीय रणनीती निश्चित करण्यासाठी नवी दिल्लीतील पूसा कॅम्पसमध्ये २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत बेळगाव दक्षिणचे आमदार आणि भाजपचे तेलंगणा राज्य सहप्रभारी अभय पाटील सहभागी झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी तसेच विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, बूथ स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि तेलंगणासह देशभरात पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

Tags: