बेळगावातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या खडेबाजार येथे जुनी भुयारी गटारवाहिनी बदलून नवीन वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे परिसरातील दुकाने तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून, पुढील तीन ते चार दिवस काम सुरू राहण्याची शक्यता आहे.

खुदाईदरम्यान जुनी गटारवाहिनी जमिनीखाली सुमारे १३ ते १४ फूट खोलवर आढळली. त्यामुळे ती बाहेर काढून नवीन वाहिनी टाकताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत असून कामास विलंब होत आहे.


रस्ता मोठ्या प्रमाणात खोदल्याने आजूबाजूची माती खचण्याचा धोका आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काम करणे शक्य नसल्याचे कामगारांनी सांगितले. काम पूर्ण होईपर्यंत नागरिक आणि वाहनचालकांनी खडेबाजार परिसरातून जाताना सावधगिरी बाळगावी तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



Recent Comments