State

पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळुरू मेट्रोच्या ‘पिंक लाईन’सह वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू दौऱ्यादरम्यान सिलिकॉन सिटीच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा नम्म मेट्रोच्या पिंक लाईन आणि नवीन वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केले.

सुमारे ३,४७० कोटी रुपये खर्चाच्या काळेन अग्रहार ते तावरेकेरे या नम्म मेट्रोच्या गुलाबी मार्गांतर्गत तावरेकेरे स्थानकापासून बिळेकनहळ्ळी आयआयएमबी स्थानकापर्यंतच्या मेट्रो सेवेला त्यांनी चालना दिली. त्यानंतर आयआयएमबी येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी, अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात आलेल्या चार रेल्वे स्थानकांचे लोकार्पण केले आणि नव्या वंदे भारत रेल्वेला हिरवा कंदील दाखवला.

या कार्यक्रमास राज्यपाल सुधा यादव आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते.

Tags: