Khanapur

खानापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांचा विशेष सत्कार

Share

खानापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांच्या निरंतर समाजकार्याची दखल घेऊन दोड्डहोसूर गावातील जय हनुमान शर्यत कमिटीच्या वतीने त्यांना श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

खानापूर तालुक्यात विविध क्षेत्रांत सातत्याने जनहित आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय असणाऱ्या अमृत शेलार यांच्या सेवाभावाचा कमिटीच्या सदस्यांनी गौरव केला. या प्रसंगी जय हनुमान शर्यतू कमिटीचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: