State

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Share

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी अधिकृत घोषणा केली असून दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यादगिरी जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४६२ शेतकऱ्यांसाठी १७.४३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मुख्यमंत्र्यांनी जारी केला. पहिल्या टप्प्यात २,५०० रुपये वितरित करण्यात येत असून, उर्वरित रक्कम १५ ते २० दिवसांत जमा केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. राज्यातील अन्य १५ जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच पहिल्या टप्प्यातील मदत दिली जाणार आहे. दरम्यान, दुष्काळामुळे राज्यात ५७.९३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, एकूण ६२ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या नुकसानीपोटी केंद्र सरकारकडे २२ हजार ४०० कोटी रुपयांची मदत मागण्यात आली आहे. एनडीआरएफचा निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबित पीक नुकसान भरपाई वितरित केली जाईल. यासाठी पंतप्रधानांची भेट घेण्याची वेळ मागितली असून, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी केले.

Tags: