दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या कनक दीपक कंग्राळकर हिने चार पदके जिंकली. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संजय घोडावत स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या कनकने ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक, ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक पटकावले. तसेच ४०० बाय १०० मीटर आणि ४०० बाय ४०० मीटर रिले स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली.

कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतलेल्या कनकच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, प्रशिक्षक, वडील दीपक, आई, आजी आणि बेळगावच्या माजी नगरसेविका शीतल विकास कंग्राळकर यांनी अभिनंदन केले.


Recent Comments