विजापूर जिल्हा पोलिसांनी चोरीच्या ११५ प्रकरणांची उकल करून ९.४३ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल आणि सायबर फसवणुकीतील रक्कम पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आली.

जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. ११ फेब्रुवारी ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही प्रकरणे उघडकीस आणण्यात आली.


जप्त मुद्देमालात सोने, चांदी, रोकड, ४६ दुचाकी, १६ चारचाकी वाहने, शेतातील पंपसेट, बॅटरी आणि कापसाचा समावेश आहे. याशिवाय सायबर फसवणुकीची २० प्रकरणे उघडकीस आणून ४ कोटी १९ लाख ६८ हजार १६२ रुपये तक्रारदारांना परत करण्यात आले.

विजयकुमार सारवाड इन न्यूज, विजापूर


Recent Comments