चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील मराठा मंडळ भवनात रविवारी सकाळी ११ वाजता तालुका मराठा समाजाच्या वतीने मेळावा आणि विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चिक्कोडी तालुका मराठा संघाचे अध्यक्ष बी. आर. यादव यांनी दिली.
अंकली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारचे कामगार मंत्री संतोष लाड या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने मंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात मंत्री संतोष लाड मराठा समाजातील नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला रामा माने, अनिल माने, रणजित शिरसेटे, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, अजय सूर्यवंशी, अण्णासाहेब पवार, युवराज कदम, जयराज हलगेकर, युवराज शेंडुरे, डॉ. माने यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments