Belagavi

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

Share

आगामी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाच्या निषेध फेरीत बेळगाव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच, २ नोव्हेंबरपासून आगामीबैठकीत १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या निषेध फेरीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

काळ्या दिनाला परवानगी मिळो अथवा न मिळो, तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याला आपल्या कृतीतून प्रत्युत्तर देण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकाभर जनजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे ही बैठक पार पडली. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्यासह समितीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या ७० वर्षांपासून काळा दिन गांभीर्याने पाळत आहे. यंदाही निषेध फेरीत तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाची लढाई सुरू असली, तरी रस्त्यावरच्या आंदोलनातही मराठी भाषिकांची एकजूट दाखवून देण्याची संधी काळ्या दिनाच्या फेरीतून मिळते, असे मत बैठकीत मांडण्यात आले.

२ नोव्हेंबरपासून निवडणुकांच्या तयारीला सुरुवातकाळ्या दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर २ नोव्हेंबरपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. गावोगावी जाऊन कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणे, निवडणुकीची रूपरेषा ठरविणे आणि समितीच्या उमेदवारांना पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, यावर भर देण्यात येणार आहे.काळ्या दिनाच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासह आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

Tags: