NANDAGAD

नंदगडजवळ रस्त्याकाठी मोराचे मनमोहक नृत्य कॅमेऱ्यात कैद

Share

खानापूर तालुक्यातील नंदगडजवळ रस्त्याकाठी एका मोराने पिसारा फुलवून नृत्य केल्याची घटना समोर आली आहे. हे दृश्य स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे.

खानापूर-हळियाळ राज्य महामार्गावरील होनम्मा देवीचे मंदिर आणि तलावाच्या परिसरात हा मोर दिसून आला. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे दृश्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

खानापूर तालुका पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड यांनी या मोराच्या नृत्याचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे.

अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज, खानापूर.

Tags: