खानापूर तालुक्यात एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्तीची नोटीस वाटण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सक्तीने वापर केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.

तालुक्यातील नंदगड येथील रायापूर गल्लीत एसआयआर (SIR) मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्तीची नोटीस वाटण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सक्तीने वापर केल्याचा गंभीर आरोप रायापूर सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा बीएलओ (BLO) आर. पी. डिसोजा यांच्यावर झाला आहे.

विद्यार्थ्यांना घरोघरी पाठवून नोटीस वाटप करताना पाहून प्रश्न विचारणारे खानापूर तालुका पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड यांना, बीएलओ डिसोजा यांनी “आम्ही कोणाला घाबरत नाही” असे बेजबाबदार उत्तर देत वाद घातला.
मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना अधिकृत कामासाठी वापरणाऱ्या शिक्षिकेच्या या वर्तनावर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
या प्रकरणी स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी गटशिक्षणाधिकारी व तालुका प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे वरिष्ठांचे याला मूक संमती असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या बेजबाबदार शिक्षिकेवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.


Recent Comments