Khanapur

हुलिकेरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Share

खानापूर तालुक्यातील कक्केरीजवळ असलेल्या हुलिकेरी येथील इंदिराम्मा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गणेश केदारजी पुजारी (वय १८, रा. तडकोड, ता. धारवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त गणेश हुलिकेरी येथील नातेवाइकांच्या घरी आला होता. यात्रेनिमित्त तो कुटुंबासह तलावावर गेला होता. तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या गणेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो घाबरला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याप्रकरणी अळणावर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Tags: