Kagawad

उगार शुगर कारखान्याच्या ८५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ; कॅरिअर पूजनाने सुरुवात

Share

कागवाड तालुक्यातील उगार येथील द उगार शुगर वर्क्स साखर कारखान्याच्या ८५ व्या ऊस गाळप हंगामाचा प्रारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॅरिअर पूजनाने करण्यात आला.

कारखान्याचे ज्येष्ठ उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करून नवीन हंगामाची सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी कारखान्याचे ज्येष्ठ उद्योजक प्रफुल शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर, सुहाना शिरगावकर आणि सचिन शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधींसह कॅरिअर पूजन करून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांनी, चालू हंगामात २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच उसाच्या दराबाबत बोलताना, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी २६ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयानुसार उसाचा दर जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यास कारखान्याचे माजी संचालक दीपचंद शाह, शिवगौडा कागे, कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, तसेच रामचंद्र थोरुशे, महादेव कटगेरी, अरुण गाणिगेर, सुकुमार शेट्टी, भीमू कोणे, दादा पाटील, गजानन एरंडोले, शिवानंद होसमणी, सुनील पाटील यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी आणि उगार नगरपरिषदेचे सदस्य उपस्थित होते. कारखान्याच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Tags: