हुबळीत १२ व्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला वाट करून दिली.

महिलेची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मिरवणूक आणि भाविकांच्या गर्दीमुळे रुग्णवाहिका जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. यावेळी पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येत रुग्णवाहिकेसाठी सुरक्षित मार्ग मोकळा केला. आणीबाणीच्या वेळी नागरिकांनी दाखवलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Recent Comments