hubali

हुबळीत एटीएम फोडून लाखो रुपयांची चोरी

Share

हुबळी तालुक्यातील ब्याहट्टी गावात गुरुवारी पहाटे एटीएमचे कुलूप तोडून ३ लाख रुपयांहून अधिक रक्कम लांबवण्यात आली.

पहाटे ३ च्या सुमारास एटीएममध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी रक्कम पळवल्यानंतर तेथील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड केली.

तसेच सुळ्ळ गावातील मध्यवर्ती भागातील एटीएमलाही दरोडेखोरांनी लक्ष्य केले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद मुक्तेदार आणि निरीक्षक मुरुगेश चन्नण्णवर यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

Tags: