विजापूर शहरातील गोलघुमट परिसरातील सार्वजनिक गणेश मंडपात गुरुवारी रात्री चार चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

अडीच लाख रुपये मूल्याचे आणि अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे चांदीचे दागिने चोरट्यांच्या निशाण्यावर होते. मंडपाला पडदा लावून कार्यकर्ते गेले असता चोरट्यांनी आत प्रवेश केला.

परंतु परिसरातील कुत्रे भुंकल्यामुळे एका महिलेला जाग आली आणि तिने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मंडपांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.


Recent Comments