hubali

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात

Share

चालकाचे नियंत्रण सुटल्याने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटून आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना हुब्बळ्ळी येथे घडली आहे.

हुब्बळ्ळी शहरातील देसाई सर्कलजवळ सकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. जखमी विद्यार्थ्यांना हुब्बळ्ळी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रिक्षातून १० ते १२ वयोगटातील विद्यार्थी प्रवास करत होते.

अपघातात रिक्षा चालकही गंभीर जखमी झाला आहे. स्वामी विवेकानंद रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून रुग्णालयासमोर पालकांनी गर्दी केली होती. पूर्व वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags: