Dharwad

धारवाडमधील सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनातून विषबाधा

Share

धारवाड शहरातील टीसीडब्ल्यू सरकारी शाळेत गुरुवारी मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर १६ विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला.

शाळेत दुपारी नेहमीप्रमाणे मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर सहावीच्या विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी सुरू झाली. सुरुवातीला शिक्षकांनी काही मुलींना शाळेतच विश्रांती देऊन काळजी घेतली. मात्र, त्रास वाढल्याने १६ विद्यार्थिनींना तातडीने धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच आमदार विनय कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी केली. मुली घाबरलेल्या असून त्यांना धीर देण्यात आला आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. डीडीपीआय, बीईओ यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याचे निर्देश आमदार विनय कुलकर्णी यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Tags: