भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात पंचायत राज इंजिनिअरिंग विभाग बेळगाव आणि चिक्कोडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंजिनिअर्स डे-२०२६’ साजरा करण्यात आला.


या वेळी मुख्य पाहुणे म्हणून बोलताना उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी पायाभूत सुविधा व ग्रामीण विकासात इंजिनिअर्सचे योगदान निर्णायक असल्याचे सांगत दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे, आय.ए.एस., यांच्यासह पंचायत राज इंजिनिअरिंग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


Recent Comments