Dharwad

तहसीलदार सचिदानंद यांची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी!

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील डेव्हलपर मंजुनाथ यांच्या जमिनीच्या कागदपत्रांच्या कामासाठी १ कोटी रुपयांची मागणी करून ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या धारवाडचे तहसीलदार सचिदानंद कुचनूर यांना विशेष लोकायुक्त न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या बुधवारी धारवाड येथील केसीडी कॉलेज आवारात ५० लाखांची रोख रक्कम स्वीकारताना तहसीलदार सचिदानंद यांना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. आज त्यांना विशेष लोकायुक्त न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशानंतर तहसीलदार सचिदानंद यांची धारवाड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Tags: