मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर पडलेले प्राप्तिकर छापे हे राजकीय सूडबुद्धीने टाकलेले नाहीत, असे खुद्द त्यांचे भाऊ भालचंद्र जारकीहोळी यांनीच स्पष्ट केले आहे, असा टोला विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

धारवाड येथे यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद बेल्लद यांनी सदर प्रतिक्रिया दिली. सतीश जारकीहोळी यांचे मेहुणे मंजुनाथ यांच्या घरावर धाड टाकली असता काही महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या पुराव्यांच्या आधारेच ही कारवाई झाली असून, जप्त केलेल्या कागदपत्रांची चौकशी केली जाईल, असे बेल्लद यांनी स्पष्ट केले.

देशात भ्रष्टाचारात काँग्रेसचे नेते आघाडीवर असून, जनतेचा निधी लुटणाऱ्यांवर अशा कारवाया होणारच, असे ते म्हणाले. भाजपच्या पदयात्रेवर टीका करणाऱ्या यत्नाळ यांच्याबाबत विचारले असता, यत्नाळ हे सध्या पक्षात सक्रिय नसून ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत, त्यामुळे यावर त्यांनाच विचारावे, असे त्यांनी नमूद केले.


Recent Comments