Dharwad

धारवाडमध्ये एसटी बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Share

धारवाड येथील नवीन बसस्थानकात बसमध्ये विश्रांती घेत असलेल्या सरकारी एसटी बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शिरहट्टी येथील बाळेश तेली (वय ३८) असे मृत बसचालकाचे नाव आहे. ते कलघटगी डेपोमध्ये सेवेत होते. आपली बस स्थानकात आणल्यानंतर ते बसमध्ये विश्रांती घेत असताना त्यांना अचानक छातीत कळा आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: