पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक सेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बेळगाव दक्षिण मतदारसंघात ५३ हजार घरांमध्ये दिवे लावून विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.

नरेंद्र मोदी यांनी १३ वर्षे मुख्यमंत्री आणि १२ वर्षे पंतप्रधान म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी १७ सप्टेंबर रोजी मतदारसंघातील ५३ हजार घरांत दिवे प्रज्वलित केले जातील. तसेच कलामंदिर येथे सायंकाळी ७ वाजता १ हजार दिवे लावून विशेष कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सौंदत्ती, यरगट्टी आणि रामदुर्ग भागात ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगत संयुक्त सर्वेक्षणाचे निर्देश दिले. हिडकल धरणात ४८.७ टीएमसी (९९.५२%) पाणीसाठा असून, मल्लप्रभा धरणातील साठा १८.३ टीएमसीवर आल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन आमदारांशी चर्चा करून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments