State

१० सप्टेंबरला अपेक्स बँकेची निवडणूक : मंत्री लक्ष्मण सवदी

Share

अपेक्स बँक आणि केएमएफच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारे मतदान न घेता सहमतीने बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुख्यमंत्री भेटीनंतर दिली.

बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांनी येत्या १० सप्टेंबर रोजी अपेक्स बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे सांगितले. सहकार युनियनच्या अध्यक्षपदी देवेगौडा आणि उपाध्यक्षपदी डी. के. शिवकुमार यांची निवड करण्याबाबत सदस्यांनी मत व्यक्त केले असून त्यानुसार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी सर्वांची सहमती घेऊन ही निवड बिनविरोध केली जाईल, असे सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

तीन संचालक पदांसंदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित असून, के. एन. राजन्ना यांच्या फेरनिवडीबाबत सर्वांचे मत घेऊन कोणताही गोंधळ न होता ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. तसेच केएमएफ अध्यक्षपदाची निवडही लवकरच होणार असून, तीदेखील सर्वसंमतीने बिनविरोध केली जाईल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सवदी यांनी दिली.

Tags: