Belagavi

धर्मवीर संभाजी चौक परिसरातील ‘ती’ स्क्रीन अखेर हटवली

Share

बेळगाव येथील धर्मवीर संभाजी चौकात गणेश मंडपाच्या उभारणीला अडथळा ठरणारी एलईडी स्क्रीन हटवण्याच्या स्थानिक मंडळांच्या निदर्शनांना अखेर यश आले आहे.

मध्यवर्ती महामंडळाची मध्यस्थी आणि स्थानिकांच्या सहकार्याने ही वादग्रस्त स्क्रीन दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असून उत्सवाचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील धर्मवीर संभाजी चौकातील श्री दत्त मंदिराच्या जवळ गणेशोत्सव मंडपाच्या जागेत ही एलईडी स्क्रीन बसवण्यात आली होती. यामुळे स्थानिक मंडळांच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. या विषयाची गंभीर दखल घेत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चेद्वारे वादावर तोडगा काढला.

सुरुवातीला स्थानिक गणेश मंडळाचा तीव्र विरोध असतानाही ही स्क्रीन बसवण्यात आली होती. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थितीची जाणीव करून दिली. या समन्वयातून आता ती स्क्रीन तिथून पूर्णपणे हटवून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरू झाले आहे.

Tags: