महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण भरले असून धरणातून टप्प्याटप्प्याने ३३ हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे.

यामुळे सीमाभागातील चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यांमधील नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणातील पाणी आणि स्थानिक भागात होणाऱ्या पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्या ओसंडून वाहत आहेत.

चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळ कृष्णा नदीत दोन्ही राज्यांतील विविध स्रोतांतून एकूण ९९ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह येत असून नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



Recent Comments