जिल्हा केंद्र होण्यासाठी सर्व अर्हता मिळालेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात आता विकास पूर्णपणे गायब झाल्यासारखा आहे. शहरातील प्रमुख रस्ते अपघातांना निमंत्रण देणारे जीवघेणे खड्डे बनले असून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.


जिल्हा केंद्र बनण्याची सर्व लक्षणे असणारे चिक्कोडी शहर आज मूलभूत सुविधांपासून वंचित राहून हाल अपेष्टा सहन करत आहे. चिक्कोडी शहरातील केरूूर क्रॉस ते हालत्ती दरम्यानचा रस्ता तर पूर्णपणे हलाखीचा झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना इंच न् इंच मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेला हा मुख्य रस्ता आता थेट जीवघेणा बनला आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीचे आश्वासन अधिकारी देतात, पण काम मात्र शून्य! अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे चिक्कोडीला जिल्हा करण्याची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे स्वतः शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. केरूूर क्रॉस ते हालट्टी दरम्यान रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, या भ्रमात नागरिक पडले आहेत.


Recent Comments