महाराष्ट्र राज्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिकोडी व निपाणी तालुक्यात कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही तासांत पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.


महाराष्ट्रातील विविध धरणांमधून आणि नद्यांमधून सध्या कल्लोळजवळ कृष्णा नदीत ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील ५ सखल पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक गावांचा थेट रस्ते संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

येडूर – कल्लोळ, बावनसौंदत्ती – मांजरी, बारवाड – कुन्नूर, कारदगा – भोज आणि भोज – शिवापूरवाडी हे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.


Recent Comments