Bellary

बळ्ळारीतील नबी रसूल खून प्रकरणाला नवे वळण

Share

बळ्ळारी येथे नुकत्याच झालेल्या नवविवाहित नबी रसूल याच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात कौल बाजार पोलिसांना यश आले असून या प्रकरणात त्याच्या जवळच्या मित्रांनाच अटक करण्यात आली आहे

खाणींचे शहर असलेल्या बळ्ळारीतील भट्टी परिसरात १६ जुलै रोजी २१ वर्षीय नबी रसूल या तरुणाचा मृतदेह आढळला होता मटण विक्रीचे काम करणाऱ्या नबी रसूल याने स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शननंतर मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते या पार्टी दरम्यान नबी रसूल आणि एका अल्पवयीन मित्रात किरकोळ कारणावरून वाद झाला वादाच्या वेळी नबी रसूल याने त्या मित्राच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याने संतापलेल्या मित्राने आणि त्याच्या साथीदारांनी या हत्येचा कट रचला

नबी रसूल स्वतःच्या सुरक्षेसाठी सोबत ठेवत असलेला सुरा हिसकावून घेऊन त्या अल्पवयीन मुलाने त्याच्यावर वार केले घटनेनंतर तांत्रिक पुरावे आणि टॉवर लोकेशनच्या आधारे कौल बाजार पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलगा ताहीर उर्फ हीना आणि समीर या तिघांना अटक केली आहे या घटनेतील सलमान नावाचा मुख्य संशयित पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

Tags: