धारवाडमधील विहिरीत पोहायला गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

धारवाडच्या तेजस्वी नगर येथील रहिवासी असलेला लक्षित उप्पर (वय १७) हा रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विहिरीवर पोहायला गेला होता. मात्र, अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली होती. आज मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



Recent Comments