Dharwad

धारवाड बस स्थानकात बसखाली चिरडून विद्यार्थिनीचा मृत्यू

Share

धारवाड जुन्या बस स्थानकात सरकारी बस मागे घेताना झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बस आणि कंपाऊंड भिंतीमध्ये दबल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.

शुक्रवारी सायंकाळी धारवाड जुन्या बस स्थानकात सरकारी बस मागे घेतली जात होती. यावेळी बस आणि स्थानकातील कंपाऊंड भिंत यांच्यात अडकून फतिमा बाबाजान जागीरदार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बस स्थानकावर गर्दी असल्याने हा प्रकार घडला.

मयत फतिमा ही चंदनमट्टी गावची रहिवासी होती आणि धारवाडमधील मदिना महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होती. कॉलेज सुटल्यानंतर ती गावी जाण्यासाठी बस स्थानकात आली होती. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

Tags: