State

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार निश्चित, मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती

Share

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित असून यामुळे खात्यांच्या कामकाजाचे व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे होईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या बेंगळुरू दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, मंत्रिमंडळात एकाच वेळी २० जणांना स्थान मिळणार की महामंडळांच्या अध्यक्षांची निवडही सोबतच होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे मात्र निश्चित आहे. आगामी २४ जुलै रोजी राहुल गांधी एका कार्यक्रमासाठी बेंगळुरू येथे येत असून, त्यांच्या या दौऱ्याचा मंत्रिमंडळ विस्ताराशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील पाण्याच्या परिस्थितीवर बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, सध्या राज्यात कोणतीही पाणीटंचाई नाही. जलाशयांमध्ये पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Tags: