मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बूथ पातळीवरील अधिकारी आणि बूथ पातळीवरील एजंट यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी लोकसभा सदस्य जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

या बैठकीत किरण जाधव यांनी सर्वेक्षण करताना बीएलओ आणि बीएलए कर्मचाऱ्यांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, नागरिकांशी समन्वय साधताना होणारा त्रास आणि ही मोहीम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी बीएलओ आणि बीएलए कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या गांभीर्याने घेतल्या जातील, अशी ग्वाही दिली. संबंधित विभाग आणि शासनाकडे याविषयी पाठपुरावा करून आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, मतदार यादी पुनरिक्षणाचे काम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी कौतुक केले.
या बैठकीला हनुमंत कागलेकर, राजन जाधव, गणेश देधे, पार्थ भोसले आणि विनायक शिंगावकर उपस्थित होते.


Recent Comments