आमदार विनय कुलकर्णी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे धारवाड ग्रामीण मतदारसंघात पोटनिवडणुकीची चिन्हे आहेत. या शिक्षेला तूर्तास स्थगिती नसल्याने भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सन २०२३ च्या निवडणुकीत भाजपचे अमृत देसाई यांचा पराभव करून विनय कुलकर्णी आमदार झाले होते. आता या मतदारसंघात पुन्हा एकदा दोन्ही पक्षांत थेट लढत होण्याची शक्यता आहे. भाजपमधून माजी आमदार अमृत देसाई आणि सीमा मसुती सक्रिय झाले असून, सविता अमरशेट्टी व मंजुनाथ मक्कलगेरी हे नवीन चेहरेही तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसकडून विनय कुलकर्णी यांच्या पत्नी शिवलीला कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत पतीला प्रभाग बंदी असतानाही त्यांनी प्रचार सांभाळून विजय मिळवून दिला होता. त्यांच्या सोबतीला विनय कुलकर्णी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेते तवनप्पा अष्टगी हे देखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघाचे राजकीय भवितव्य आता पूर्णपणे उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे.


Recent Comments