Uncategorized

खानापुरात जि. प. सीईओंच्या भेटीनंतर तातडीने पाणीपुरवठा

Share

खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी येथील हक्कीपिक्की आदिवासी बांधवांच्या वस्तीला बेळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट दिल्यानंतर, तिथे तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने हक्कीपिक्की आणि कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांनी विविध विभागांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह हत्तरगुंजी येथील इंदिरा नगर भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांचे शिक्षण, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे कडक निर्देश दिले होते.

सीईओ यांच्या आदेशानंतर हलकर्णी ग्रामपंचायतीने तात्काळ पावले उचलत हक्कीपिक्की कॉलनीत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. प्रशासनाने घेतलेल्या या त्वरित निर्णयाबद्दल हक्कीपिक्की समाजाचे नेते आणि स्थानिक रहिवाशांनी जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे आणि हलकर्णी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Tags: